मुख्यमंत्री फडणवीसांनी केले मनसेचे ‘उनसे’ असे नामकरण

raj thakre vr cm

टीम महाराष्ट्र देशा : ‘मनसे’चा लौकिक एके काळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा होता नंतर तो मतदार नसलेली सेना असा झाला. आता मनसेच ‘उनसे’ झाले आहे, म्हणजेच उमेदवार नसलेली सेना असा लौकिक झाला आहे.त्यामुळे राज ठाकरे आता सुपाऱ्या घेवून भाषण करत आहेत. असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे एबीपी माझा च्या विशेष मुलाखतीत बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनेक राजकीय प्रश्नांना समर्पक उत्तर दिली.

यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आता उमेदवार नसलेली सेना झाली आहे म्हणजेच उनसे या नावाने ते आता ओळखले जात आहेत. त्यामुळे सुपाऱ्या घेवून राज ठाकरे हे आता भाषण करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक सूचक विधान केले. ते असे की, शरद पवार हे अतिशय हुशार आहेत. त्यामुळे त्यांनी अशी माणस बरोबर पाळली आहेत. आणि राज ठाकरे सारखा नेता शरद पवार यांच्या या चालीला फसतो म्हणजे विशेष आहे.

दरम्यान याआधी देखील एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत राज ठाकरे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष केले होते.त्यावेळी फडणवीस म्हणाले होते की , राज ठाकरे यांनी कितीही सभा घेतल्या, तरी त्यांच्या सोबत असणारा दोन चार टक्के मतदार देखील मागे राहणार नाही. त्याच्यासोबत गेलेले लोक हे मनाने हिंदुत्ववादी आहेत, ते जेवढ भाजप – सेने विरोधात बोलतील तेवढा त्यांचा मतदार आमच्याकडे येईल, राज ठाकरेंच्या सभा म्हणजे मान न मान मै तेरा मेहमान असल्याचं, फडणवीस यांनी म्हटले आहे.