fbpx

देश चालावण्यासाठी ५६ पक्षांचे गठबंधन लागतं नाही तर ५६ इंचाची छाती लागते : देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : देश चालावण्यासाठी ५६ पक्षांचे गठबंधन लागतं नाही तर ५६ इंचाची छाती लागते असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथील भाषणात राज्यातील कॉंग्रेसच्या आघाडीवर निशाना साधला. तसेच परदेशात १ एप्रिलचा दिवस एप्रिल फुल म्हणून साजरा केला जातो. मात्र कॉंग्रेसने मागील ५० वर्षे देशाला फुल बनवलं आहे असा देखील टोला यावेळी फडणवीस यांनी लगावला.

आज पंतप्रधन नरेंद्र मोदी येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यावेळी सभेच्या सुरवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांच्या पावत्या देत विरोधकांवर निशाना साधला.

यावेळी फडणवीस पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हणाले की, मोदीजी आपल्याला या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसने राज्यात छोट्या छोट्या पक्षांना एकत्र घेत महाआघाडी केली आहे. मात्र त्यांना माहित नाही की देश चालवायला ५६ पक्षांची आघाडी लागतं नाही तर ५६ इंचांची छाती लागते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ला लक्ष करत चांगलीच टोलेबाजी केली. विशेष करून राष्ट्रवादी कॉंग्रेस ला या चौकीदाराने चांगलेच लक्ष केले.