खातेवाटप होत नाही, शेतकऱ्यांना तातडीने मदत केव्हा देणार ? – देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात सरकार स्थापन होऊन १४ दिवस होत आले तरी मुख्यमंत्री अजूनही खातेवाटप करू शकलेले नाही, मग शेतकऱ्यांना तातडीने मदत केव्हा देणार, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. कामकाज सल्लागार समितीची विधान भवन येथे बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विधिमंडळाचे आगामी नागपूर अधिवेशन हे केवळ एक औपचारिकता म्हणून घेतले जात असून आम्ही हे अधिवेशन दोन आठवड्यांचे घ्यावे, अशी मागणी केली होती, मात्र ती सत्ताधारी पक्षाने मान्य केली नाही.

खातेवाटप झाले नसल्याने नेमके उत्तर कोण देणार, चर्चा कशा होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. महाराष्ट्रात अतिशय गतीने अनेक प्रकल्प राबविले जात होते, किमान त्यांची गती तशीच कायम राखावी, अशी आमची मागणी आहे. पुढच्या वर्षीची ४ कामे कमी झाली तरी चालतील, पण शेतकऱ्यांना तातडीने मदत आधी मिळायला हवी. यासाठी सरकारला संपूर्ण सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Loading...

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर शिवसेनेने काल लोकसभेत बाजूने भूमिका घेतली होती. पण आज मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी संदिग्ध अशी भूमिका मांडली आहे. हे विधेयक देशासाठी महत्वाचे आहे, ते कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, असे सुस्पष्ट निवेदन केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह यांनी सभागृहात केले होते. सविस्तर सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहेत. आता केवळ राज्यातील सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसच्या कुठल्याही दबावात येऊन शिवसेना भूमिका बदलणार नाही, अशी अपेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार