यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला – देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापण्याचा प्रस्ताव दिला होता,’ असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. चव्हाणांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्या नेत्याने केलंलं विधान गांभिर्याने घ्यावं लागेल. जर 2014 ला सुद्धा शिवसेना काँग्रेससोबत जायला तयार होती, तर ते आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे, यातून त्यांचा खरा चेहरा उघड होत आहे अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Loading...

दरम्यान, संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की लोकसभा निवडणुकांच्या आधीपासून आम्ही चर्चा करत होतो. त्यामुळे रोज बोलणाऱ्या संजय राऊतांचं विधान आणि कमी बोलणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचं विधान एकमेकांना पूरक आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनं शिवसेनेला कोणताही प्रस्ताव दिलेला नव्हता, असंही राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी स्पष्ट केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण