fbpx

जंगल मे कितने भी शियार साथ आये, शेर को पराजित नही कर सकते – फडणवीस

Devendra fadnvis pune

बुलढाणा : देशात सध्या महागठबंधन होत आहे, परंतु जनावरांनी जंगलात एकत्रित येवून प्रयत्न केला तरी ते सिंहाला पराजित करू शकत नाहीत, अस म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाना साधला आहे. महागठबंधनमध्ये असणारा कोणताही नेता राष्ट्रीय नाही, त्यामुळे ते देशभरात प्रभाव पडू शकत नाहीत, असा घणाघात देखील फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

जंगलामध्ये कितीही लांडगे एकत्र आले तरी ते सिंहाला हरवू शकत नाहीत. त्याप्रमाणे कितीही विरोधक एकत्र आले तरी ते मोदींना पराजित करू शकणार नाहीत, शरद पवार हे तामिळनाडूमध्ये सभेला गेले तर चार लोक येणार नाहीत. स्टॅलिन मणिपूरला गेले तर दोन माणसे जमा होणार नाहीत. अखिलेश यादव कर्नाटकात गेले तरी हीच परस्थिती होवू शकते. महाआघाडीतील सर्व नेता आपल्या आपल्या भागाचे नेते असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

देशामध्ये नरेंद्र मोदी हे एकमेव नेते आहेत, जे देशात कोठेही गेले तरी लाखोंची गर्दी होते. सर्व विरोधक एकत्र आले तरी ते काही करू शकणार नाहीत. सर्व विरोधकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि ‘इलाके कुत्ते बिल्ली के होते है, शेर तो अकेला होता है’. म्हणत फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांची स्तुती केली आहे.