काँग्रेस आपली जबाबदारी झटकून दोष मुख्यमंत्र्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे – फडणवीस

uddhav-thackeray fadnvis

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला 28,104 कोटी रूपये मदत मिळाली आहे. केंद्राच्या पॅकेजमधून विविध क्षेत्रांचे जे प्राथमिक आकलन झाले, त्यातून 78,500 कोटी रूपये राज्याला मिळतील तसेच केंद्राच्या निर्णयांमुळे 1,65,000 कोटी रूपये वित्त उभारणीचे सहाय्य राज्याला मिळणार असून, यामुळे एकूण 2,71,500 कोटी रूपयांचा लाभ महाराष्ट्राला होईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एका पत्रपरिषदेत केले.

याबाबतची सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात राज्याला भरीव केंद्र सरकारने दिली आहे. प्रधानमंत्री गरिब कल्याण याजनेत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या तीन महिन्यांत केंद्र सरकारने अन्नधान्य महाराष्ट्राला दिले. गव्हासाठी 1750 कोटी रूपये, तांदळासाठी 2620 कोटी रूपये, डाळीसाठी 100 कोटी रूपये, स्थलांतरित मजुरांसाठी : 122 कोटी रूपये असे एकूण 4592 कोटी रूपये अन्नधान्यासाठी केंद्र सरकारने दिले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत 1726 कोटी रूपये, जनधन योजनेच्या माध्यमातून 1958 कोटी रूपये, विधवा/दिव्यांग/ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 116 कोटी रूपये असे एकूण 3800 कोटी रूपये केंद्र सरकारने दिले. उज्वला गॅस योजनेत 73 लाख 16 हजार सिलेंडर, 600 रेल्वेगाड्यांसाठी 300 कोटी रूपये, बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण 1001 कोटी रूपये, एसडीआरएफमध्ये 1611 कोटी रूपये आणि आरोग्यासाठी 448 कोटी रूपये असे एकूण 2059 कोटी रूपये दिले. डिव्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून 5648 कोटी रूपये देण्यात आले. शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेल्या निधीत कापसासाठी 5647 कोटी रूपये, धानासाठी 2311 कोटी रूपये, तूरसाठी 593 कोटी रूपये, चणा आणि मक्यासाठी 125 कोटी रूपये, तसेच पीकविम्यासाठी 403 कोटी रूपये असे एकूण 9079 कोटी रूपये देण्यात आले. हा संपूर्ण खर्च पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला या काळात 28,104 कोटी रूपये दिलेले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अहमदाबादमध्ये किमान ४० लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत : सचिन सावंत

महाराष्ट्राला आरोग्यासाठी सुद्धा मोठी मदत मिळाली. महाराष्ट्राला हायड्रोक्सिक्लोरोक्विन: 47 लाख 20 हजार, प्रयोगशाळांना मान्यता : शासकीय 41/खाजगी 31, पीपीई किटस : 9.88 लाख, एन 95 मास्क : 15.59 लाख तसेच आरोग्यासाठी मदत 468 कोटी रूपये मदत देण्यात आली. केंद्र सरकारच्या पॅकेजमधून एमएसएमई/ गृहनिर्माण/ डिस्कॉम/ नरेगा/ आरआयडीएफ/ कॅम्पा एम्पॉयमेंट/ स्ट्रीट वेंडर्स/ फार्मगेट इन्फ्रा, मायक्रो फूड एन्टरप्राईजेस, पशुसंवर्धन इत्यादींतून किमान 78,500 कोटी रूपये महाराष्ट्राला मिळतील. जे मिळाले ते 28 हजार कोटी रूपये, केंद्राच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राला जो निधी उभारता येऊ शकतो, तो 1,65,000 कोटी रूपये आणि केंद्राच्या पॅकेजमधील 78 हजार कोटी रूपये असे एकूण 2,71,500 कोटी रूपयांचा लाभ होऊ शकतो. आता राज्य सरकारने धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट आहे. रूग्णसंख्या/मृत्यू यात मोठी वाढ होत आहे. आता चाचण्यांची संख्या सुद्धा अतिशय कमी करण्यात आली आहे. काल केवळ 2900 चाचण्या केल्या आहेत. आता एकूण चाचण्यांपैकी 32 टक्के रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

ते पुढे म्हणाले की, राहुल गांधीजी यांचे आजचे विधान तर अतिशय गंभीर आहे. स्वत:च्या जबाबदारीपासून पळणारे हे विधान आहे. त्यांच्या विधानावरून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर या सरकारची प्राथमिकता काय आहे, हे सहज लक्षात येईल. सध्या लढाई कोरोनाविरूद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. सध्या कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत, असेही त्यांनी शेवटी सांगितले. प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आणि केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

पुणे विमानतळावर देशांतर्गत विमानसेवेतून ‘इतक्या’ नागरिकांचे झाले आगमन