काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात- फडणवीस

devendra fadanvis

मुंबई : त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत तर देशात ‘डावे’ फक्त नावाला उरले आहेत असे म्हणत चिमटा काढला आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पूर्वोत्तरच्या कार्यकर्त्यांचं फडणवीसांनी अभिनंदन केलं.

नेमकं काय म्हणाले फडणवीस
‘एका पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर मोदींवर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे. हा ट्रेलर आहे, कर्नाटकात भाजपचं सरकार येणार आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताने निवडून येणार. काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत तर देशात ‘डावे’ फक्त नावाला उरले आहेत. आम्ही गमतीने म्हणायचो, की पूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का? मात्र या तिन्ही राज्यात भाजपला 49 ते 50 टक्के मतदान असल्याने अभूतपूर्व विजय मिळाला. या राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्वास दाखवला आहे.’

1 Comment

Click here to post a comment
Loading...