हिंदुत्व सहिष्णू, त्यामुळेच ओवेसी अजूनपर्यंत सुरक्षित आहेत – देवेंद्र फडणवीस

owaisi fadnavis

नागपूर : बिहार विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून यश मिळवल्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पदवाधीर मतदारसंघाच्या मिशनवर आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात सहा ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस याठिकाणी संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसत आहेत.

याचदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हिंदुत्व सहिष्णू आहेत म्हणूनच असदुद्दीन ओवेसी भारतात काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर हल्ला होत नाही. यामधूनच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी एका सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक सुख आण समाधानाने नांदत आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच हिंदू बहुसंख्य असणाऱ्या देशात असदुद्दीन ओवेसी काहीही बोलू शकतात. तरीही ओवेसींवर हल्ला होत नाही. यामध्येच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते. हैदराबादच्या निवडणुकीसाठी ओवेसी सध्या काहीबाही बोलत आहेत. मात्र, त्यांना याचा फायदा होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या