मुंडे आणा नाहीतर आणखी कोणीही आणा मला फरक पडत नाही – देवेंद्र फडणवीस

devendra-fadnavis

मुंबई : आपल्या कामाच्या धडाकेबाज स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली केल्यापासून नागपुरात आयुक्त विरुद्ध भाजपा असं वाद निर्माण झाला होता. अनेक वेळा हा वाद चव्हाट्यावरही आला. अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं होतं. दरम्यान, अचानक तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरून बदली करण्यात आली. मुंढे यांच्या बदलीविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ‘तुकाराम मुंढे काय कुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही’, असा टोला राज्य सरकारला लगावला आहे.

मला त्रास देण्यासाठीच त्यांची नियुक्ती केली जरी असेल तरी माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. याचं कारण म्हणजे माझी दोन नंबर्सची कामे नाहीत. त्यामुळे तुकाराम मुंढे काय किंवा अन्य कुणीही आला तरी मला फरक पडत नाही. हे सरकार सुडाचं राजकारण करते आहे अस देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मीडिया, विरोधीपक्ष, सोशल मीडिया यावर आपल्या विरोधात कुणी बोलूच नये असं सरकारला वाटतं. कुणी विरोधात बोलले तर त्याच्या मागे बीएमसीला लावलं जातं. महाराष्ट्रात असं सुडाचं राजकारण कधी झालं नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या