तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आश्वासन

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असं आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिलं.

दरम्यान,महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ,’ अशी ग्वाही दिली आहे. तर विरोधकांकडून आता सरकारला लक्ष्य केले जाऊ लागले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारने मराठा समाजाला फसवलं आहे, अशी खोचक टीका काँग्रेसचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी सरकारवर केली आहे.वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बाजू न्यायालयात सरकार योग्य प्रकारे न मांडल्यामुळे आज विद्यार्थ्यावर ही वेळ आली असल्याचंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.Loading…
Loading...