मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

uddhav-devendra

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज(१७ सप्टें.) औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित आहेत. दरम्यान औरंगाबादमधील जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनवेली ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्र्यांनी ‘व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी’, असे वक्तव्य केले आहे. ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरेंच्या या विधानावर सुचक वक्तव्य केले आहे. फडणवीस म्हणाले की,’मुख्यमंत्र्यानी मनातील भावना बोलवून दाखवली असेल. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते पण आज तसे होताना दिसत नाही. सध्या भाजप सक्षम विरोधी पक्ष म्हणून चांगल काम करत आहे’. तसेच शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याचे आम्हाला दु:ख नाही. राज्यातील हे सरकार अनैतीक सरकार आहे. त्यांनी मी शुभेच्छा देतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भावना दुटप्पी आहे. असेही ते म्हणाले.

दरम्यान या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात तसेच अब्दुल सत्तर यांची उपस्थिती होती. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा नेमका जोर कुणाकडे होता. यावरून वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या