कांदा निर्यात बंदी त्वरित मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे पियुष गोयलांना पत्र

Piyush Goyal and fadanvis

मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केल्याननंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असतानाच केंद्राने निर्यातबंदी लावल्याने भाव घसरला आहे. यामुळे कोंडीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक आमदार, खासदारांनी भूमिका घेतली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कांदा बंदी उठावण्यासाठी पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून या विषयात विस्तृत चर्चा केली होती.

त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा पत्राद्वारे कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी अशी मागणी केली आहे. “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत असून ते दुःखी आहेत. महाराष्ट्राच्या कांद्याची अंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगला मोबदला देखील मिळतो. आपण लवकरच उचित निर्णय घ्याल अशी आशा आहे.”

दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनीही कांदा निर्यातबंदीवरून नाराजी व्यक्त केली आहे. कांदा निर्यातबंदी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी असून निर्यातबंदी रद्द करावी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे. “कांद्याचं उत्पादन करणारा शेतकरी हा गरीब आहे. कोरोना काळात खरं तर संपूर्ण देशाला सावरण्याचे काम शेतकऱ्यानी केलं. त्यामुळे देशाला अन्नधान्य आणि भाजीपाल्याची कमतरता भासली नाही. आज जगभरात कांद्याला मोठी मागणी आहे. अशावेळी निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे,” असं उदयनराजे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:-