मुंबई –माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समित्या महाविकास आघाडी सरकारने स्थापन केल्या होत्या, याबाबत जलसंधारण विभागाने नुकताच अहवाल दिला असून त्यात जलयुक्त शिवार योजनेत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हणत फडणवीसांना क्लीन चीट देण्यात आलीआहे. उलट जलयुक्त शिवार योजनेमुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, आता क्लीन चीट मिळाल्यानंतर भाजपनेते चांगलेच आक्रमक झाले असून भाजपने राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली.
ये पब्लिक है, सब जानती है !
जलयुक्त शिवार हे अभियान राष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले असून, यावर ज्यांनी टीका केली होती त्यांना या अहवालामुळे चपराक बसली आहे.@Dev_Fadnavis यांचे सरकार हे शेतकरी हिताचे होते ते परत एकदा जनतेसमोर आलंय. pic.twitter.com/HNnhQt1Hjd
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) October 27, 2021
दुसऱ्या बाजूला भाजपचे माजी आमदार आणि पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील ठाकरे सरकारवर शरसंधान केले आहे. ते म्हणाले, ये पब्लिक है, सब जानती है ! जलयुक्त शिवार हे अभियान राष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले असून, यावर ज्यांनी टीका केली होती त्यांना या अहवालामुळे चपराक बसली आहे.देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे शेतकरी हिताचे होते ते परत एकदा जनतेसमोर आलंय असं त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- रेल्वेत प्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता लसीच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक
- ‘मी गुन्हा केला नाही’, नवाब मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर वानखेडेंचे उत्तर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<