दहशतवाद्याच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

devendra fadnavis

नवी-दिल्ली : पाकिस्तानने फंडिंग केलेल्या दहशतवादी मॉड्यूलला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतेच अटक केले आहे. तसेच या प्रकरणी तपास यंत्रणांनी ६ जणांना अटक केली आहे. तसेच यांपैकी एका दहशतवाद्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक मुंबईत सापडला. फक्त एव्हढेच नव्हे तर दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आली आहे.

दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया देत फडणवीस म्हणाले की,’ही फारच गंभीर गोष्ट आहे. देशाच्या विविध भागांमध्ये आणि विशेषतः मुंबईत दहशतवादी सापडणं ही धोक्याची घंटा आहे. मला वाटतं की ह्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशा ठिकठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढणे अत्यंत गरजेचे आहे आणि पुन्हा असं काही घडू नये याची काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांना संपवूनच टाकायला हवं’ असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या