‘असल्या फडतूस नोटीसा आणि धमक्यांना मी घाबरत नाही’; सोमय्यांचे परबांना खडेबोल

soamyya

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर परब यांना सक्तवसुली संचालनालयाने मनी लॉन्डरिंगप्रकरणी चौकशीचा समन्स देखील बजावला होता. परंतु आता आरोप करणाऱ्या सोमय्यांना योग्य ते उत्तर देण्यासाठी परब यांनी संपूर्ण तयारी केली आहे.

याबाबत बोलताना परब म्हणाले कि, ‘तथ्य नसलेल्या आरोपांमुळे सामान्य माणसांमध्ये माझी प्रतिमा मलिन होत असून कुटुंबाची विनाकारण बदनामी होत आहे.’ त्यामुळे परब यांनी तब्बल १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दाव्याची नोटीस वकिलामार्फत किरीट सोमय्या यांना बजावली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर ७२ तासाच्या आत माझ्या आरोपांबाबत केलेले सर्व ट्विट डिलिट करण्याचा आणि बिनशर्त माफी मागण्याचा इशारा या नोटिशीच्या माध्यमातून परब यांनी सोमय्यांना दिला आहे.

यावर आता किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला खडेबोल बोल सुनावले आहेत. ‘उद्धव ठाकरेंच्या सरकारकडून मला आतापर्यंत अर्धा डझन अशा नोटीसा मागील काही दिवसांपासून मिळालेल्या आहेत. असल्या फडतूस नोटीसा आणि धमक्यांना मी घाबरत नाही. मी आजपर्यंत २६ घोटाळे उघडकीस आणले आहेत. त्यात काही अधिकारी आणि नेते हे प्रत्यक्ष सहभागी आहेत. मी ११ जणांची टीम जाहीर केली होती पण त्यात आता ३ राखीव खेळाडू सहभागी झाले आहेत. पण आता मी आणखीन ३ नेत्यांच्या घोटाळ्याचा अभ्यास करत आहे. लवकरच त्यांचा पण पर्दाफाश करू.’ असा इशाराच त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या