देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी; राजकीय चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी; राजकीय चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस

मुंबईः महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. यासाठी सगळेच पक्ष आपला झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसत आहे. या अनुषंगाने आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)दिल्लीत दाखल झाले आहेत.

गुरुवारीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) देखील दिल्लीत दाखल झाले असून काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) भेट घेतली होती. त्यानंतर आज लगेच देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. आज फडणवीस कोणाची भेट घेणार, याकडे आता लक्ष असणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती अमित शाह यांना दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी या भेटीनंतर सांगितलं. राज्यातील सद्यस्थितीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली.

दरम्यान, काही दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नव्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यामुळं चंद्रकांत पाटील आणि फडणवीस यांच्या दिल्लीवारीनंतर भाजप- मनसे युतीबाबत चर्चा होणार असल्याचे म्हंटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या