‘देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत’

मुंबई : देवेंद्र फडणवीस हे फारकाळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. त्यांना फारकाळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही. त्यांचे नशीब मोठे आहे, असे सूचक विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी शुक्रवारी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

नागपुरात साधना बँकेचा लोकार्पण सोहळ्यात भय्याजी जोशी यांनी हे वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात जेव्हा भय्याजी जोशी यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस हेदेखील मंचावर उपस्थित होते. ‘देवेंद्रजी यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेता हा जास्त दिवसांचा विषय नाही. तसेच माजी मुख्यमंत्रीपदीह अल्पायु आहे. लोकशाहीत कमीअधिक घडत असते,’ असे ते म्हणाले.

Loading...

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आणि संध्याकाळी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी फडणवीसांचे जाहीर कौतुक करीत केले त्यामुळे फडणवीसांचे नेमके होणार काय ? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आले आहे.

दरम्यान, मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच याबाबत स्पष्टीकरण देऊन मी दिल्लीत जाणार नाही. महाराष्ट्रातच राहणार. मी मैदान सोडणाऱ्यांमधला नाही असं सांगत दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका