देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार ? राफेल प्रकरणावर तेलंगणा मध्ये पत्रकार परिषद

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार अश्या चर्चा कायमच होत असतात. अभ्यासू व्यक्तिमत्व आणि हिंदी-इंग्रजी भाषेवरील या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. राफेल प्रकरणावर भाजपतर्फे देशभरात पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा तर्फे देशभरात पत्रकार सत्तर परिषदांच आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद हैद्राबाद मध्ये आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमठवला आहे. त्यासोबत यशस्वी मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांच्याकडे पहिले जाते. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात भाजपचा विजयरथ त्यांनी कायम राखला आहे. त्यामुळे फडणवीस राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार अश्या चर्चा होतात. भाजपातर्फे राफेल प्रकरणावर त्यांची हैद्राबाद येथे पत्रकार परिषद आयोजित केली गेल्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत.

You might also like
Comments
Loading...