नारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली

टीम महाराष्ट्र देशा : ”नारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली. आज राऊत आमच्या सरकारला शाप देत आहेत. पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते,” असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना लगावला आहे.

सरकार स्थापन होऊन दहा दिवस झाले तरी अद्याप खातेवाटप झाले नाही. राज्यातील विकासकामांना स्थगिती दिली जात आहे. ठेकेदारांकडून पैसे उकळले जात आहेत. बाळासाहेबांचे हिंदुत्व शिवसेना विकते आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी आज परिषदेमध्ये केली. त्याला राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

Loading...

राऊत म्हणाले, राणेंची दखल घेण्याची आम्हाला आवश्यकता नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, अशी मराठीत म्हण आहे. त्यानुसार राणेंच्या शापांमुळे महाविकास आघाडीच्या सरकारला कुठलाही धोका होणार नाही. नारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली. त्यामुळे राणेंनी ते सावरता येते का ते पहावे. नाही तर पुढचा विचार जरुर करावा.” अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.

तसेच आयुष्यभर ज्यांनी ठेकेदारी केली, दमदाटी करुन पैसे उकळण्याचे काम केले. चेंबूरच्या नाक्यावर बसून कोंबडी कापल्या. त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कृपेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळवले. त्या नारायण राणेंना अज्ञातवासात त्यांचा भूतकाळ आठवतो आहे. असेही राऊत यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे कोंबड्या कशा कापल्या, लोकांना फसवले कसे हे आठवून त्यांची मुक्ताफळे सुरु आहेत. त्याची दखल आम्ही घेत नाही. कोकणातील जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांनी वनवासात जावे आणि उर्वरित आयुष्य हरिनामाचा जप करत घालवावे. असेही राऊत यावेळी म्हणाले .

तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात आदर्श सरकार ठरेल. त्याचे अनुकरण देशातले लोक नक्की करतील आणि तशी सुरुवातही झाली आहे, असा विश्वासही राउत यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले