देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवारांची भेट? चर्चांना उधान

devendra and sharad pawar

मुंबई : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. मात्र, ही भेट कुठल्याही राजकीय उद्देशाने नसून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते शरद पवारांना भेटणार आहेत. शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच पित्ताशयाशी संबंधित आजारवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर, सध्या ते घरीच विश्रांती घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे पवारांच्या भेटीला जाणार आहेत. अशी माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात चौकशी करण्यासाठी फडणवीस भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. आज किंवा परवा ही भेट होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते कोरोना लसीकरणासंदर्भात करत असलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. राज्याच्या लसीकरण क्षमतेनुसारच टार्गेट ग्रूपला आवश्यक इतक्या लशींचा पुरवठा केंद्राकडून केला जात आहे. केंद्र सरकारकडून सर्वाधिक लसी महाराष्ट्रालाच दिल्या जात आहेत. भारत सरकार काही वेगळं आहे का? त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्र्यांनी या गोष्टी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी चर्चा करावी. माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे आधी बंद झालं पाहिजे’, असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या