तुमची मानसिकता राजेशाही तर आम्ही जनतेचे सेवक, मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

टीम महाराष्ट्र देशा: मी महाजनादेश यात्रेत पाच वर्षात केलेल्या कामांचा हिशोब देत आहे, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमच्याकडे हिशोब देण्यासाठी लेखनिक होता अशी टीका करतात. यामधूनच त्यांची मानसिकता हि राजेशाही असल्याचं दिसून येत. परंतु मी जनतेचा सेवक आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्यावर केली आहे.

आज महराष्ट्रात कॉंग्रेसचे अस्तित्व दिसत नाही. मागील निवडणुकीत शिवछत्रपतीचा आशीर्वाद आणि मोदींजींचे नेतृत्व आपल्यासोबत होते. आता छत्रपतीचे वारस आपल्यासोबत आहेत. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

येत्या काळामध्ये कोकणातील वाहून जाणारे पाणी उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात आणायचे आहे. मोदींच्या ५ ट्रीलीयन डॉलरच्या भारताच्या योजनेत महाराष्ट्राचा वाटा १ ट्रीलीयन करायचा आहे. पाच वर्ष प्रामाणिक सरकार चालवलं, भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. महाराष्ट्राच्या सोशल इंजीनियरिंगमध्ये न बसणा-या माझ्यासारख्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं याबद्दल मोदीजींचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.