मुंबई : ठाकरे सरकारने आज मुंबईकरांच्या फायद्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करण्याचा दिलासादायक निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या आदेशानुसार राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः दिली आहे. महाविकास आघाडीच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
“2017 चे वचन पूर्ण करण्यासाठी अखेर 2022 हे निवडणुकीचे वर्ष उजाडले! देर आए दुरुस्त आए…!” असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसत आहे.
2017 चे वचन पूर्ण करण्यासाठी अखेर 2022 हे निवडणुकीचे वर्ष उजाडले!
देर आए दुरुस्त आए… !#Mumbai #taxrelief #tax https://t.co/kd3MmBMrWG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 1, 2022
नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित करत आपली भूमिका मांडली होती. याबाबतचा व्हिडिओ फडणवीसांनी शेअर केला होता. त्याबाबतच आज ठाकरे सरकारने निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
- “मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर 5 वर्षे काहीच बोलत नाहीत”
- राज्यात लॉकडाऊन होणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
- तुम्ही हर्बल वनस्पती किंवा क्रुझ पार्टीत ड्रग्ज घेऊन तर…; मुनगंटीवारांचा पवार, परबांवर निशाणा
- जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर ‘त्या’ मिम जोरदार चर्चा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<