दरेकरांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांनी सोडलं मौन; म्हणाले, ‘राष्ट्रवादीकडे कुठले मुद्दे नाहीत त्यामुळे…’

devendra fadnavis vs ncp

नागपूर : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना प्रवीण दरेकर यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने वाद निर्माण झालाय.

काल शिरुरमध्ये प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले. राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दरेकर यांच्यावर हल्लाबोल केला असून माफी मागितली नाही तर गाल लाल करण्यात येईल असा आक्रमक इशारा देखील देण्यात येत आहे.

यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की प्रवीण दरेकर यांनी बोलीभाषेत अशाप्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे कुठले मुद्दे नाहीत. त्यामुळे असे मुद्दे हाताशी घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत,’ असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी राष्ट्रवादीचा समाचार घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या