युतीच्या तणावाच शिवसेनेलाच नुकसान होणार- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेसोबत युतीसाठी हात पुढे केला आहे. युतीचा तणावाच शिवसेनेलाच नुकसान होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पोटनिवडणुकांच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

२०१९ ला भंडारा-गोंदिया भाजपच निवडणूक जिंकणार! असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच इव्हिएम मशीन बंद पडल्यामुळे भाजपला सुद्धा फटका बसला आहे. इव्हिएम बाबत निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. असे त्यांनी स्पष्ट केले.