देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं ; अशोक चव्हाणांचा टोला

ashok chvan vs devendra fadanvis

मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे या भेटीसाठी उपस्थित होते.

तर, ठाकरे व मोदी यांची वैयक्तिक वेगळी भेट झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पत्रकार परिषदेमध्ये खुद्द उद्धव ठाकरेंनी या भेटीची कबुली दिली आहे. या ‘एकांतातील’ भेटीवर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘मला आनंद आहे की किमान त्यांनी केंद्र सरकार बरोबर संवाद केला त्याचे आम्ही स्वागत करतो. भेट घेतली हे ठीक आहे. दरवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा भेट घेतली ते बरं झालं पण जे मुद्दे राज्याचे आहे. त्यावर भेट घेण्यापेक्षा केंद्राच्या मुद्यावर भेट घेतली तर बरं होईल,’ असा टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला होता.

यावर आता या भेटीत उपस्थित असणारे अशोक चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीच्या मुद्द्यावरुन अशोक चव्हाण यांनी राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींसोबत आज झालेल्या भेटीबाबत ज्या संघटना विरोधी वक्तव्य करत आहेत, त्या भाजपप्रणित आहेत.

विरोधकांनीही आपलं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे जावं आणि बाजू मांडावी, असं आव्हान चव्हाण यांनी भाजपला दिलं आहे. ‘पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच ही भेट राजकीय तडजोडीसाठी नव्हती. देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं. त्यांना उलट आनंद वाटला पाहिजे,’ असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

 

IMP