तरच मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती शक्य- देवेंद्र फडणवीस

Devendra_Fadnavis

मुंबईच्या विकासाचं भाजपचं व्हिजन मान्य असेल, तरच शिवसेनेशी युती होईल, असं वक्तव्य नागपुरात पत्रकारांसोबत झालेल्या गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.फडणवीस यांनी महापालिकेतील गैरकारभाराबद्दल तीव्र नाराजी दर्शवली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी मुंबईत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. एमएमआरडीएचं बजेट कमी असून कामं जास्त आहेत, मात्र महापालिकेचं बजेट एवढं अवाढव्य असूनही काहीच कामं होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवल्याचंही चित्र आहे. त्यामुळे युती होणार की दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.