Share

Devendra Fadanvis | निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : निवडणूक आयोगाने (निवडणूक आयोग) शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण गोठवल्याने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयोगाने देन्ही गटांना एक दिवसाची मुदत दिली असून नवीन चिन्हं आणि नावं देण्याचा आदेश दिला आहे. यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया –

मला झालेल्या निर्णयाचं आश्चर्य वाटंत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एवढंच नाही तर गेल्या २०-२५ वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा असा वाद झाला तेव्हा निवडणूक आयोगाने हाच निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अंधेरी पूर्वच्या पोट निवडणुका तोंडावर आल्या असल्याने हा निर्णय होणं गरजेचं होतं, त्यामुळे निवडणूक आयोग ज्यावेळी निर्णय देईल त्यावेळी एकनाथ शिंदे यांची बाजू वरचढ राहिल, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं उद्धव ठाकरे यांच्याकडून ठरवण्यात आली आहे. तसेच, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, ही नावं देण्यात आली आहे.याबाबतची माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : निवडणूक आयोगाने (निवडणूक आयोग) शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण गोठवल्याने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now