Share

Shivsena | शिंदे-ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा पुन्हा धक्का! ‘ते’ नाव ही गोठलं

मुंबई : काल दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावरून वेगवान घडामोडी सुरु होत्या. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे यांना धक्का भेटला. यानंतर आयोगाने दोन्ही गटाला एक दिवसाची मुदत दिली होती. अशातच उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग (Election Commision) यांच्याकडे ३ चिन्हे आणि नावे दिले असून निवडणूक आयोगाने आणखीन एक धक्का दिला आहे.

निवडणूक आयोग यांचा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना धक्का –

उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून ठरवण्यात आली आहे. तसेच, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), शिवसेना प्रबोधनकार ठाकरे (Prabhodankar Thackeray), ही नावं देण्यात आली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने आता शिवसेना हे नावच गोठवलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.

चिन्ह गोठवल्यानंतर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचं अस्थित्व काही नाही. निवडणूक आयोगानं चिन्ह गोठविलं. हा मुद्दा गैर आहे. जे अर्ज करतात ते अंधेरीतील निवडणूक लढविणार आहेत का? भाजप निवडणूक लढविणार नाही. पण, हा भाजपचा अजेंडा आहे. अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मनातली खदखद व्यक्त करताना सांगितलं की, चिन्ह गोठविलं. मनातली जागा नाही गोठवली. चिन्ह गोठविलं पण, रक्त पेटविलं आमचं. या सगळ्यानं आम्ही घाबरणार नाही, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : काल दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावरून वेगवान घडामोडी सुरु होत्या. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र, निवडणूक …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now