इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली

मुंबई : राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यावरुन सुरु असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेले सर्व स्वातंत्र्यसैनिक महान होते, ते आपली दैवतं आहेत. मात्र, किती दिवस इतिहासावर बोलत राहणार आहात. आता इतिहासाकडून शिकून, प्रेरण घेऊन आजचे प्रश्न साडवायला हवेत, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत या संदर्भात नेमके कोणत्या संदर्भात बोलले हे आपल्याला माहीत नसून राऊत यांचे वक्तव्य वैयक्तीक आहे, ती पक्षाची भूमिका नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. वाद निर्माण करण्यापेक्षा ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले तो देश विकास करतोय का याकडे लक्ष देण्याचा आवश्यकता आहे, असे सांगत या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी दिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वच नेत्यांनी योगदान दिले असून सर्वच रत्ने महान आहेत, असे सूचक वक्तव्यही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

Loading...

आदित्य यांच्या या सवालाचा धागा पकड फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, केवळ एक व्यक्ती नाही, तर तो एक विचार आहे! … हा केवळ इतिहास नसतो,तर तो वर्तमान आणि भविष्यकाळ सुद्धा असतो! अशा शब्दात ट्विट करत फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. एक वृत्तपत्राने या संदर्भात वृत्त दिले आहे.

‘माफिया डॉन करीम लाला-इंदिरा गांधी’ भेटीबाबत वक्तव्य करत वाद ओढवून घेणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत नवे वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याला विरोध करणाऱ्यांना ज्या तुरुंगात इंग्रजांनी सावरकरांना ठेवले होते, त्याच तुरुंगात पाठवायला हवे, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार