‘लोकशाहीत असा मोठेपणा खूप कमी लोक दाखवतात’

‘लोकशाहीत असा मोठेपणा खूप कमी लोक दाखवतात’

Devendra Fadnavis and Narendra Modi

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शुक्रवारी तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेत असल्याची घोषणा केली आणि देशभरातील विरोधकांनी एकच जल्लोष केला. विरोधकांनी जल्लोष जरी केला असला तरी शेतकऱ्यांच हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकर नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी स्पष्ट केलं आहे. जोपर्यंत संसदेत या घोषणेवर निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं राकेश टिकैत म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे तीनही कृषी कायदे मागे घेतले असले तरी त्यांनी नाईलाजाने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. शेतकऱ्यांना आम्ही हे कायदे समजाऊन सांगण्यात कमी पडलो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी देखील मागितली आहे. या निर्णयानंतर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याच सोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन मोठे असल्याचे देखील कौतुक करत विरोधकांवर टीका केली आहे.

निर्णय मागे घेण्याचा मनाचा मोठेपणा पंतप्रधानांनी दाखवला आहे. अशा प्रकारचा मनाचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात, असं वक्तव्य भाजप पक्षाचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. टीका करणारे टीका करतात, काम करणारे काम करतात. देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला होता. पण काही लोक सतत विरोध करत होते. जे टीका करतात त्यांनी शेतकाऱ्यांसाठी काहीच केलं नाही. त्यांची भूमिका दुटप्पी आहे, त्यामुळे त्यांना जनताच उत्तर देईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: