‘केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी ‘गांधी’ होत नाही’

टीम महाराष्ट्र देशा : राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाचीही सर नाही. त्यांनी स्वत:ला ‘गांधी’ समजण्याची घोडचूक तर अजिबातच करू नये. तसेच केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी ‘गांधी’ होत नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला ‘गांधी’ समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये, असे म्हणत फडणवीस यांनी राहुल गांधीवर टीकास्त्र सोडले.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सत्य बोलण्यासाठी मला माफी मागायला सांगितली जात आहे. मात्र, तसे करायला मी काही राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे, असा टोला राहुल गांधी यांनी भाजपला लगावला होता.

महत्वाच्या बातम्या