तर महाराष्ट्रातील हा प्रकल्प जाऊ शकतो गुजरातला

टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या नाणार प्रकल्पाला दिवसेंदिवस विरोध वाढत आहे. त्यामुळे हा विरोध असाच सुरु राहिल्यास हा प्रकल्प गुजरातला जाईल असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. शिवसेना तसेच नव्याने भाजपचे मित्र झालेले नारायण राणे हे रत्नागिरीमध्ये नाणार प्रकल्पा उभारण्यास विरोध करत आहेत.

कोकणामध्ये नाणार प्रकल्प झाल्यास निसर्गिक साधनसंपत्तीच आणि मासेमारीचं मोठ्या नुकसान होईल असा आक्षेप प्रकल्प विरोधकांकडून घेण्यात आला आहे. जवळपास तीन लाख कोटींचा असणाऱ्या या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.

या प्रकल्पाची उभारणी करणारी अराम्को कंपनी महाराष्ट्राच्या हद्दीतील भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर ऑईल रिफायनरीचा प्रकल्प टाकू इच्छिते. त्यामुळे राज्य सरकारकडून कंपनीला नाणारचा प्रस्ताव देण्यात आला आहे, तसेच येथे प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारकडून देखील हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. मात्र वाढता विरोध पाहता 3 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला जाऊ शकतो असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

You might also like
Comments
Loading...