शेतीसाठी दिवसा अखंड बारा तास वीज पुरवठा- मुख्यमंत्री

शेतीसाठी दिवसा बारा तास अखंड वीज पुरवठा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सह्याद्री वाहिनीच्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमातून शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते काल बोलत होते.
केंद्र सरकार उपलब्ध करून देत असलेल्या निधीतून राज्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं काम सुरु आहे. यातूनच शेतकऱ्यांसाठी दिवसा १२ तास अखंड वीज उपलब्ध होणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरणार आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

bagdure
सरकारी साखर कारखाने तसंच शेतकऱ्यांच्या मदतीनं राज्य शासन, राज्यातल्या पाच धरण क्षेत्रातील संपूर्ण ऊस शेती ठिबक सिंचनावर आणणार असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या अपूर्ण सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून २६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्याचा विकास करताना कृषी आणि ग्राम विकासाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही त्यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली.

 

मुख्यमंत्री म्हणाले..

  • जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील पाच नद्यांचे पुनरुज्जीवन करणार
  • नाशिकच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लागणाऱ्या आच्छादनांची निर्मितीही राज्यात करण्याचे प्रयत्न
  • राज्याचा विकास करताना कृषी व ग्रामविकासाला प्राधान्य

 

You might also like
Comments
Loading...