देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला ‘शिवतिर्था’वर; चर्चेला उधाण

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला ‘शिवतिर्था’वर; चर्चेला उधाण

Devendra fadnavis And Raj Thackeray

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी किंवा आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे आणि भाजप यांच्यामध्ये युती होणार का? याची तुफान चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. ही चर्चा दोन्ही पक्षांकडून जशी पूर्णपणे स्वीकारण्यात आलेली नाही, तशीच ती पूर्णपणे नाकारण्यात देखील आलेली नाही.

आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे यातून वेगळ्याच राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे. भाजप आणि मनसे यांच्यामध्ये युती होणार यावर ही भेट म्हणजे शिक्कामोर्तब असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून या भेटीविषयी जाहीर चर्चा करण्यात आलेली नसली, तरी या भेटीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबत राजकीय चर्चा सुरु आहे.

आज सकाळी आमदार सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी संपावर देखील भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या