देवेंद्र फडणवीस सर्वात अकार्यक्षम मंत्री! जयंत पाटलांनी जाणून घेतला कौल महाराष्ट्राचा

jayant patil vr cm

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वात अकार्यक्षम मंत्री आहेत. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ट्वीटवर म्हटले आहे. जयंत पाटील यांनी राज्यातील सर्वात अकार्यक्षम मंत्री कोण ? असा प्रश्न विचारला होता. याबाबत जनतेने कौल दिला असल्याचे पाटील म्हणाले.

काय म्हणाले जयंत पाटील ?

कौल महाराष्ट्राचा..!
“काल मी या ठिकाणी ‘आपल्या राज्यातील सर्वात अकार्यक्षम मंत्री कोण ?’असा प्रश्न विचारला होता. याबाबत जनतेने कौल दिलेला आहे. 51 टक्के लोकांना असे वाटते की देवेंद्रजी म्हणजेच आपले मुख्यमंत्री महोदय हे सर्वात अकार्यक्षम मंत्री आहेत”

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/993009532648509446