आम्ही तिघे त्रिशूळासारखे आणि एकदा त्रिशूळ चाललं की कामचं होत : देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टोलेबाजी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथे सभा घेतली.

यावेळी फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगलेचं लक्ष्य केले. फडणवीस म्हणाले की, ज्याप्रमाणे भोले शंकराचा त्रिशूल चालला की काम झाल्याशिवाय राहत नाही, त्याप्रमाणेच आमच्या तिघांचा म्हणजेच हर्षवर्धन पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघे त्रिशूळ असून, त्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लागल्याशिवाय सोडणार नाही.

फडणवीस यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यात मागील पाच वर्षांत झालेली कामे केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पावसाळ्यात नेहमी एकीकडे पूरस्थिती, तर दुसरीकडे मोठा भाग कोरडा राहतो. यातून मार्ग काढण्यासाठी पुराचे पाणी सुकलेल्या भागात आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या