शहराचे नामांतरणासाठी केलेल्या पत्रव्यवहाराकडे देवेंद्र फडणवीसांनी दुर्लक्ष केले – राजू वैद्य

औरंगाबाद : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहराचे नामांतरण करणे व स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्र उभारणीसाठी पत्रव्यवहार केला होता, मात्र फडणवीस यांनी लक्ष दिले नाही. सत्ता गेल्यानंतर आता भाजप पदाधिकारी संभाजीनगरचा मुद्या काढत आहेत. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्व बेगडी असल्याचा आरोप शिवसेनेचे पुर्व विधानसभा संघटक, नगरसेवक राजू वैद्य यांनी केला आहे.

शिवसेनेची कोंडी करण्यासाठी शहराच्या नामांतराचा विषय भाजपने ऐरणीवर आणला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकतेच महापौरांना पत्र दिले असून, महापौरांनी मात्र यापूर्वीच दोन ठराव घेण्यात आलेले असल्यामुळे नव्याने ठराव घेण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे.

Loading...

या वादासंदर्भात वैद्य यांनी भाजपवर टीका केली आहे. निवेदनात म्हटले आहे, सहा ऑगस्ट 2018 ला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना शहराच्या नामांतरणासाठी मी पत्र दिले होते. औरंगाबाद महापालिका, राज्यात आणि केंद्रात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आहे सगळीकडे युतीची सत्ता असतांनाही आतापर्यंत औरंगाबादचे नामकरण संभाजीकरण का झाले नाही अशी भावना शहरवासियांच्या मनात आहे, आम्हालाही या प्रकाराची खंत वाटत आहे.

नामकरणासंदर्भात दोन वेळा सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजुर करून पाठविण्यात आल्याचेही या पत्रात अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रलंबित प्रस्ताव मंजुर करण्यात यावा, अशी इच्छा असल्याचे स्पष्ट केले त्याचबरोबर तीन जानेवारी 2019 ला शहरात होत असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर संशोधन केंद्रासाठी 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, असे पत्र देण्यात आले; परंतु फडणवीस सरकारने या दोन्ही पत्राकडे दुर्लक्ष केले आता भाजपची सत्ता गेली आणि त्यांना शहराच्या नामकरणाची आठवण झाल्याचा टोला लगावत वैद्य यांनी भाजपचे हिंदुत्व बेगडी असल्याचा आरोप केला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी