आज ओ हुए मशहूर जो काबिल न थे, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात

मुंबई : राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना याचा निषेध भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी झाले आहे.

मुंबईत आझाद मैदानावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘ हे सरकार जनतेने निवडून दिलेलं नाही, तडजोड करुन सत्तेवर आलेलं सरकार आहे, आज ओ हुए मशहूर जो काबिल न थे, और मंजिले मिली उनको जो दौड में शामिल न थे, अशी अवस्था आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी सरकावर टीकास्त्र सोडले आहे.

Loading...

तर आम्हाच्या विश्वासघाताची आम्हाला चिंता नाही, आम्ही लढणारे आहोत, पुन्हा मैदानात जाऊन राज्य परत मिळवू. राज्यात जे सरकार आलं आहे, ते जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही. शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका या सरकारने सुरू ठेवली आहे. 25 हजार हेक्टरीबाबत काय झालं सांगा उद्धवजी, बांधावर जाऊन तुम्ही घोषणा केली होती. बांधावर जाऊन 25 हजार हेक्टरी मदतीची घोषणा कुणाची होती? सांगा उद्धवजी, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.

ठाकरे सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीवर फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून विश्वासघाताची मालिकाच सुरु झाली असून ठाकरे सरकारला ३ महिने झालेत अजून एक रुपया देखील मदत नाही शेतकऱ्यांना झालेली नाही. अस फडणवीस म्हणाले आहेत. याच गतीने कर्जमाफी केली ३५ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी ४६० महिने लागतील अशी खिल्ली देखील सरकारची फडणवीस यांनी उडवली आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे