Share

Devendra Fadnavis | “मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही…” ; कर्नाटक मंत्र्यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadnavis |  नागपूर : सीमावादावर कर्नाटक सरकारच्या विरोधाच काल ठराव मांडल्यानंतर कर्नाटक सरकराचे मंत्री संतापले आहेत. कर्नाटकचे कायदे मंत्री माधू स्वामी यांनी मुंबईला केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी वादग्रस्त मागणी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे सभागृहाच्या लक्षात आणून दिले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अजित पवार यांनी महत्वाचा विषय उपस्थित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेतली त्यावेळी दोन्ही राज्यांनी हे मान्य केलं होत की नव्याने दावे करण्यात येणार नाहीत. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आपण काल ठराव केला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मंत्र्यांनी, आमदारांनी किंवा काँग्रेसच्या अध्याक्षांनी जे दावे केले आहेत. हे दावे बैठकीशी विसंगत आहेत. ते पूर्णपणे चुकीचे आहेत. मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही. आम्ही त्यांचा निषेध करतो. निषेधाचे पत्र आम्ही त्यांना पाठवू. गृहमंत्र्यांच्या बैठकीत जे ठरले आहे. त्याविरोधात वक्तव्य करणे हे दोन्ही राज्यांच्या संबंधांसाठी चांगले नाही. हे त्यांना कडक शब्दात सांगण्यात येईल.”

“कर्नाटक मंत्र्यांच्या दाव्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यात येईल. महाराष्ट्र बैठकीत ठरल्याप्रमाणे पालन करत आहे पण कर्नाचक त्याचे पालन करत नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील कर्नाटकच्या अशा बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहीजे, अशी विनंती आम्ही करु. मी पुन्हा एकदा सांगतो मुंबई महाराष्ट्राचीच आहे, कुणाच्या बापाची नाही. त्यामुळे मुंबईवर कुणाचा दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही, ” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार –

“कायदे मंत्री माधू स्वामी यांनी मुंबईला केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर करावा अशी मागणी त्यांच्या विधान परिषदेत केली. मुंबईमध्ये 20 टक्के लोक कन्नड भाषिक राहतात, असा जावई शोध त्यांनी लावला. तर कर्नाटकचे विधान परिषदेचे सदस्य लक्ष्मण सौदी यांनी तर मुंबई ही कर्नाटकची आहे, असा दावा करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. सीमाप्रश्नाला अशा प्रकारे चुकीचे वळण देण्याचे व सीमावासियांच्या भावनेला ठेच पोहोचवण्याचे प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होतोय”, ही माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फोर्मेशन द्वारे सभागृहात मांडली.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या कर्नाटक सरकारच्या दोन्ही वक्तव्याचा तीव्र निषेध करावा. तसेच ही माहिती केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात यावी. असे प्रकार पुन्हा खपवून घेतले जाणार याबद्दल त्यांना ताकीद द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात करत कर्नाटकचे कायदे मंत्री व त्यांच्या आमदारांचा तीव्र निषेध व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या : 

Devendra Fadnavis |  नागपूर : सीमावादावर कर्नाटक सरकारच्या विरोधाच काल ठराव मांडल्यानंतर कर्नाटक सरकराचे मंत्री संतापले आहेत. कर्नाटकचे कायदे मंत्री …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nagpur Politics