योगींना जे जमते ते देवेंद्र फडणवीस यांना का जमत नाही- खैरे

Chandrakant-Khaire

औरंगाबाद-  औरंगाबाद चे संभाजीनगर झाले पाहिजे मागणीसाठी शिवसेनेचे टी व्ही सेंटर येथे संभाजी महाराजांच्या पूूतळ्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले . उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ यांनी ज्याप्रमाणे शहरांची नावे बदलली तसे देवेंद्र फडणवीस यांना का जमत नाही असा सवाल करत औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर झालेच पाहिजे या मागणीचा खा. चंद्रकात खैरे यांनी पुनरुच्चार केला.

काय म्हणाले खैरे ?

स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षा पूर्वी औरंगाबाद चे संभाजीनगर आम्ही सत्तेत आल्यानंतर करणार असे आश्वासन दिले होते मात्र या अश्वासनाचा विसर शिवसेना आमदार व मंत्र्यांना पडला असल्याचे खरे यांनी सांगितले पुढे बोलताना खैरे म्हणाले की शिवसेना आमदारांनी एकत्र येऊन औरंगाबाद चे संभाजी नगर व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव द्यावा तो प्रस्ताव केंद्रात आल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने तो मंजूर करून घेऊ. उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ यांनी ज्याप्रमाणे शहरांची नावे बदलली तसे देवेंद्र फडणवीस यांना का जमत नाही.

 यावेळी मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि आमदार संजय शिरसाट यांची गैहजेरी असल्याचं ही जाणवले आहे ते का उपस्थित नाही राहू शकले याचे उत्तर मात्र गुलदस्त्यातच आहे. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडले सह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या