पुणे : राज्यपाल कार्यालयाने माहिती अधिकारात खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे. नितीन संजय यादव यांनी राजभवन कार्यालयाकडून माहिती अधिकारात उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे कोणत्या तारखेस राज्यपालांना भेटले याची माहिती मागविली होती. यावर राज्यपाल कार्यालयाने खोटी माहिती दिली आहे.
राजभवन कार्यालयाने देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांसोबत भेट झालेची नोंदच राजभवन दैनंदिन कार्यक्रम पत्रिकेत नसल्याची धक्कादायक व खोटी माहिती दिल्याचे नितीन संजय यादव यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर २८ जुन २०२२ ( मंगळावार) रोजी देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल यांना भेटले होते. विवीध वृत्तपत्रात व न्युज चॅनेलवर तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. असे असतानाही राजभवन कार्यालयाने देवेंद्र फडणवीस भेटलेच नसल्याची खोटी माहिती दिली आहे.
यासोबतच राज्यपालांनी नवीन सरकार स्थापनेसाठी ज्यांना निमंत्रण दिले होते. त्याची माहिती तसेच एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना दिलेले पत्र याची माहिती राज्यपालांनी अद्यापही त्यांच्याजवळच राखून ठेवली आहे. त्यांच्याच राजभवन कार्यालयासही ती माहिती उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे ही माहिती राज्यपालांनी स्वतःजवळ ठेवण्याचे नेमके कारण काय? त्यांना कशाची भिती आहे?, असा प्रश्न नितीन संजय यादव यांनी उपस्थित केला आहे.
Devendra Fadnavis | "सत्तास्थापनेवेळी फडणवीस राज्यपालांना भेटलेच नाहीत" ; राज्यपाल कार्यालयाने दिली खोटी माहिती माहिती @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/z0Pu8J9Y7q
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 8, 2022
माध्यमांतील वृत्तानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची २८ जुन २०२२ (मंगळवार) भेट घेतली होती. या भेटीमध्ये भाजपने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असून लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | अतिप्रमाणात गरम पाणी पीत असाल तर ते आताच थांबवा, कारण आरोग्यासाठी ते हानिकारण
- Jayant Patil | मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Viral Video | चालत्या ट्रेनच्या इंजिनमधून निघाली आग, व्हिडिओ बघून व्हाल थक्क!
- Nashik | नाशिक शहरात अग्नितांडव! आणखीन एका चालत्या प्रवासी बसने घेतला पेट
- Adipurush | “आजच्या काळातील क्रूर” ; ‘आदिपुरुष’मधील रावणाच्या लुकवरून सुरू असलेल्या टीकांवर ओम राऊत यांची प्रतिक्रिया