‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ची अवस्था राजाच्या मेलेल्या पोपटासारखी, देवेंद्र फडणवीस यांची टीका

Devendra Fadnavis

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडची अवस्था राजाच्या मेलेल्या पोटासारखी केली असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये आयोजित बँकांच्या ‘मंथन’ बैठकीनिमित्त ते शहरात आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आमच्या सरकारच्या कार्यकाळात मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना सुरू झाली होती. मात्र, या सरकारने त्या योजनेची अवस्था केवळ कागदोपत्री ठेवली आहे. गोष्टीतील राजाचा पोपट ज्या प्रमाणे मेलेला होता. मात्र, त्याला कोणी झोपलेला म्हणायचे तर कोणी सोपेचे सोंग घेतलेला म्हणायचे, तशीच अवस्था झाली असल्याचे ते म्हणाले. ही योजना मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा नमूद केले.

विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या संदर्भात राज्य सरकारने अन्याय केला असल्याची आमची स्पष्ट भूमीका असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातील अतिरीक्त पाणी मराठवाड्याला देणाऱ्या येजनेचे श्रेय हवे तर सरकारने घ्यावे, मात्र ही योजना पूर्ण करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या संदर्भातले सरकारचे निर्णय मराठवाडा आणि विदर्भाच्या विरोधातील असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या