मुंबई : आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब भाजयुमो अध्यक्ष प्रशांत लोमटे आणि इतरांनी जिल्ह्यातील 3,50,287 शेतकर्यांवर पीकविम्यासंदर्भात झालेल्या अन्यायाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या सर्व शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे.
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘सातत्याने केंद्र सरकारवर टीका करण्यापलिकडे आणि जबाबदारी ढकलण्यापलिकडे महाविकास आघाडी सरकार काहीच करीत नाही. राज्यात सरकार असताना शेतकर्यांना आपले लढे उच्च न्यायालयापर्यंत लढावे लागत असतील, तर यापेक्षा कोणते दुर्दैव त्यांच्या नशिबी यावे?’, असे फडणवीस म्हणाले आहेत.
सातत्याने केंद्र सरकारवर टीका करण्यापलिकडे आणि जबाबदारी ढकलण्यापलिकडे महाविकास आघाडी सरकार काहीच करीत नाही.
राज्यात सरकार असताना शेतकर्यांना आपले लढे उच्च न्यायालयापर्यंत लढावे लागत असतील, तर यापेक्षा कोणते दुर्दैव त्यांच्या नशिबी यावे?#Farmer #Maharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 8, 2022
दरम्यान, विमा कंपन्यांनी 6 आठवड्यात या शेतकर्यांना त्यांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. विमा कंपन्यांनी ही भरपाई न दिल्यास 6 आठवड्याच्या आत राज्य सरकारने ही नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकर्यांना मदत करावी, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “फुले विरुद्ध टिळक हा वाद निरर्थक, शिवराय महाराष्ट्रात जन्मले हेच…”, संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
- “हे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचा शोध राज ठाकरेंनी…”, संजय राऊत यांचे टीकास्त्र
- “ज्यांना काहीच निर्माण करता येत नाही तेच इतिहास…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
- नवनीत राणांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले,“या सरकारने क्रौर्याच्या सर्व सीमा…”
- “काढलेले भोंगे पुन्हा लावल्यास त्यांच्यावर…”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा