मुंबई: मध्य प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळं मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने राजकीय वर्तुळात उत्साह दिसून येत आहे. तर इकडे महाराष्ट्रातही यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र यावरूनच भाजपकडून ठाकरे सरकारला घेरले जात असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक भाजप नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली असल्याचा आरोप करत जोरदार टीका केली आहे.
मध्यप्रदेश सरकारने एम्पिरिकल डेटा तयार करून संपूर्ण अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय अहवाल सादर करण्यास सांगितला. त्यांनी तोही अहवाल सादर केला आणि आज त्यानुसार, त्यांना ओबीसी आरक्षणाची परवानगी मिळाली. ओबीसी आरक्षणासाठी एम्पिरिकल डेटा सादर करा, असे आम्ही प्रारंभीपासून सांगत होतो. पण, महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारकडे बोट दाखविण्यात मग्न होते. वर्षभरानंतर मागासवर्ग आयोग गठीत केला, तर त्यांना निधीच दिला नाही. मध्यप्रदेशने लगेच मागासवर्ग आयोग नेमला होता. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली आहे. महाराष्ट्रात निव्वळ राजकारण झाले. मंत्रीच मोर्चे काढत राहिले आणि निव्वळ भाषणे करीत राहिले. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज राजकीय आरक्षणाला मुकला. असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मध्यप्रदेश सरकारने एम्पिरिकल डेटा तयार करून संपूर्ण अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय अहवाल सादर करण्यास सांगितला. त्यांनी तोही अहवाल सादर केला आणि आज त्यानुसार, त्यांना ओबीसी आरक्षणाची परवानगी मिळाली.#OBC #MP pic.twitter.com/DYAUSR7GDG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 18, 2022
तसेच आम्ही जेव्हा वारंवार सांगत होतो की, ट्रिपल टेस्ट करा. तेव्हा हेच नेते खिल्ली उडवित होते. आजचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. मुख्यमंत्र्यांनी तर या प्रश्नात लक्षच घातले नाही. आता सरकारमधील जबाबदार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मध्यप्रदेशने ट्रिपल टेस्ट केली म्हणून त्यांना ओबीसी आरक्षणाची परवानगी मिळाली. महाराष्ट्राने ‘ट्रिपल टेस्ट’ केली असती, तर महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण मिळाले असते. हा डेटा सादर होत नाही आणि ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोवर रस्त्यावर आमचा संघर्ष सुरूच राहील. असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- OBC Reservation : “ओबीसींबद्दल नकली प्रेम दाखवणे सोडून…”, चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला सुनावले
- “नाकाने वांगे सोलायचे उद्योग थांबवा, यामुळे…” ; राम सातपुतेंचा रोहित पवारांवर घणाघात
- OBC Reservation : “ठाकरे सरकारमधील ओबीसी नेत्यांनी लाज असेल तर…”, निलेश राणेंचा टोला
- IPL 2022 MI vs SRH : टिम डेव्हिडला आऊट होताना पाहून सारा तेंडुलकरची भयानक रिअॅक्शन व्हायरल; पाहा!
- “जेव्हा देशाला गरज होती, तेव्हा…” ; काँग्रेसचा हात सोडताना हार्दीक पटेल काय म्हणाले? वाचा सविस्तर