पवारांच्या बारामतीत जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची जोरदार टोलेबाजी, म्हणाले…

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टोलेबाजी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बारामतीत सभा घेतली. यावेळी पवारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अवस्था शोले पिक्चर मधल्या जेलर सारखी झाली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, और बचे हुए मेरे पीछे आओ, अशी टीका फडणवीस यांनी केली. तर शरद पवार म्हणतात मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे. मी पैलवान तयार करतो. मात्र आज वास्तव वेगळचं आहे. कारण शरद पवारांनी तयार केलेले पैलवान सगळे पळून जात आहेत. त्यांच्यासाठी मैदानात उतरण्यास कोणी तयार नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

गेल्या वेळेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ४१ जागा निवडून आल्या होत्या. मात्र या निवडणुकीला २० उमेदवारही निवडून येणार नाही, असेही फडणवीस म्हणाले. बारामतीत यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना शह देण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांना रिंगणात उतरवल आहे.

महत्वाच्या बातम्या