पवारांची अवस्था म्हणजे ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ…बाकी मेरे पिछे आवो’ – फडणवीस

devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा:- राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराने आता जोर धरला आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज फलटनमध्ये सभा आयोजित केली होती.यावेळी बोलताना ते म्हणाले ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ…बाकी मेरे पिछे आवो…अशी शरद पवारांची अवस्था असल्याचे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, तुम्ही 15 वर्षे सत्तेत होतात, पण आम्ही फक्त 5 वर्षात जनतेचे कामे केली. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहीलोत. कर्जमाफी केली, वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान आम्ही शेतकऱ्यांना दिली. आघाडीच्या सरकारने 15 वर्षात फक्त 20 हजार कोटी शेतकऱ्यांना दिली. पण, भाजप सरकारने फक्त 5 वर्षात 50 हजार कोटी शेतकऱ्यांना दिले असे देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांकडून सभांचे आयोजन केले जात आहे. तसेच आपण केलेल्या कामाची पोचपावती पोहचविण्यासाठी नेते मंडली चांगलेच सक्रीय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे.

महत्वाच्या बातम्या