Share

Devendra Fadnavis | निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या शिवसेनेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई : शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी हालचाल झालेली पाहायला मिळली. आयोगाने दिलेला निर्णय शिवसेना पक्षाला (ठाकरे गटाला) मान्य नसल्यामुळे त्यांनी आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात दिल्लीतील उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये निवडणूक आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. अशातच यावर भाजप पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आणि अप्रत्यक्षपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

आपल्या बाजूनं निकाल दिला तर उत्तम अन्यथा संस्थाविरोधात बोलायचं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

वेळ काढून कायदा टाळता येत नाही

पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, निवडणूक आयोगाने शिवसेनेला पाहिजे तेवढी वेळ दिली. पण, वेळ काढून कायदा टाळता येत नाही, कधीतरी त्याला सामोर जावं लागतं. आयोगाने अंतरिम निर्णय दिला आहे, अंतिम नाही. त्यामुळे एखादे प्रकरण कमजोर असते तेव्हा स्वायत्त संस्थावर हल्ला करायचा ही शिवसेना, काँग्रेसची पद्धत आहे.

ठाकरे-शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर सादर केलेली चिन्हे

दरम्यान, निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यामुळे दोन्ही गटाला 10 ऑक्टोबर म्हणजेच आज दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करायचे होते. ठाकरे गटाने आयोगासमोर उगवता सूर्य, त्रिशूळ आणि मशाल या चिन्हांचा पर्याय दिला. तर शिंदे गटाने देखील उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या तीन चिन्हांचा पर्याय आयोगासमोर दिला असल्याचं समजतं आहे. शिंदे गटाला ठाकरे गटाची सगळीकडून कोंडी करायची असल्याचं यावरून लक्षात येतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी हालचाल झालेली …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now