म्हणून, देवेंद्र फडणवीसांनी केले उद्धव ठाकरेंचे अभिनंदन

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांचे अभिनंदन केले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकास्त्रही सोडले.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे आणि सीएए या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परखड भूमिका घेतली. या दोन बाबींसाठी मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन करायचे आहे. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद या दोन्ही घटना वेगळ्या नाहीत, हेच आतापर्यंतच्या तपासात आढळून आले आहे. तसेच तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्य आहे. तसेच जनगणनेचा कायदा कठोर आहे. प्रश्नावली ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असल्याचं  त्यांनी सांगितले.

Loading...

त्याचसोबत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. असे सांगत त्यांनी ‘शिदोरी’ मासिकावर कारवाई करावीच लागेल. असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, इंदिराजींबाबत 10 मिनिटात माफी मागणारे सावरकरांबाबत मौन का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला सवाल विचारला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, ‘राम मंदिरासाठी ट्रस्ट तयार करावा, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तर मुस्लिम समाजाचे सर्व स्थळ हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येतात, हेही त्यांना ठावूक आहे. तेथे ट्रस्ट नसतो असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. तर सद्या मुस्लीम मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे, असा टोला काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश