शिवसेना बरोबर असो वा नसो तुम्ही निवडणूक युद्धाची तयारी ठेवा – मुख्यमंत्री

टीम नाहाराष्ट्र देशा : शिवसेनेसोबत युती झाली नाही, तरी आपण काय करू शकतो, हे आपण दाखवून दिले आहे. पण, आता केवळ निवडणुकीपुरता विचार न करता गावागावांत भाजपची ताकद वाढवण्याची गरज आहे. हिंदुत्ववादी विचारांच्या विविध पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहेच, पण युद्धाची तयारी नेहमी ठेवली पाहिजे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षाचा मालक हा कार्यकर्ता आहे. तो अतिसंवेदनशील आहे. पण सतत विरोधी पक्षात राहण्याच्या सवयीमुळे नकारात्मक भाव निर्माण झाला आहे. असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं आहे. भाजपच्या पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

दहा कामांपैकी पूर्ण झालेल्या सात कामांचा विचार न करता आपण अपूर्ण तीन कामांविषयी चिंता करतो. ते सोडून आता सरकारची कामे लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहचतील, याकडे लक्ष द्या. अशा सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश