Devendra Fadnavis | मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) बहुचर्चित त्रवार्षिक निवडणूक आज पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर काल स्नेहभोजनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर दिसून आले. मुख्यमंत्री शिंदे शेजारी बसलेले असतानाच त्यावेळी शरद पवार यांनी आपली पत्नी शिंदे कुटुंबातील असल्याचं सांगत आपण शिंदेंचे जावई असल्याचं पवार म्हणाले. माझे सासरे शिंदे होते म्हणून शिंदेंनी आपल्या जावयाची काळजी घ्यावी असा मिश्कील टोला पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे प्रत्युत्तर
आताच पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांवर जी काही जबाबदारी टाकली आहे. ती जबाबदारी टाकताना मुख्यमंत्र्यांना असं बांधलेलं आहे, असं म्हणत सासरच्या माणसांना कोण टाळू शकतं?, असा सवालही फडणवीस यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय म्हणाले
शरद पवार म्हणाले होते की, “नुसते शिंदे नव्हते क्रिकेटर होते. शिंदेंची मुलगी पवारांची बायको आहे. त्यामुळे शिंदेंनी आपल्या मुलीची काळजी नीट घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्याचा गांभीर्याने विचारल कराल, अशी विनंती करतो.”
पवारांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनीही उत्तर दिलं. मला आणि फडणविसांना थोडी थोडी बॅटिंग येते. तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली. त्यामुळे सर्वांच्या आशीर्वादानं मॅच जिंकली. काहींचे मनापासून आशीर्वाद होते. पवार साहेबांचा जन्म साताऱ्याचा आहे. माझा जन्मही साताऱ्याचा आहे. पवारांनी साहेबांनी जे सांगितलं आहे, ते आम्हाला करावंच लागेल. पवार साहेब आपण जे म्हणालात, त्याने आम्हाला आनंद झाला आहे. देवेंद्रजींनाही आनंद झाला आहे. तिकडे आशिषलाही आनंद झाला आहे. काही लोकांची काही लोकांची झोप उडू शकते ना तुमच्या वक्तव्यामुळे! पण त्यांच्या वक्तव्यामुळे आम्हाला आनंद झाला, असं शिंदे यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या :
- Narendra Modi | मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन, म्हणाले…
- Eknath Shinde | “ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है”; शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला
- Sharad Pawar । माझे सासरे शिंदे होते, म्हणून शिंदेंनी आपल्या जावयाची काळजी घ्यावी; पवारांच्या वक्तव्याने शिंदे-फडणवीस खळखळून हसले
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या गटाच्या अडचणी वाढल्या!, ‘या’ बड्या नेत्यांवर अटकेची टांगती तलवार
- Eknath Shinde । मी, फडणवीस पवार एकत्र आल्यानं काहींची झोप उडू शकते; शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला